गुरुवार, २९ एप्रिल, २०१०   1 टिप्पणी(ण्या)


मराठी भाषा अतिशय चमत्कार करू शकणारि आहे.
जेवढे लालित्य भषाविलास, वाग्वैभव संस्कृत दाखवु शकते तेवढेच सामर्थ्य मराठीमधेहि आहे.
व्याकरण, अलंकार, शब्दविभ्रम, वृत्तरचना यांचा समृद्ध असा खजिना हा संत अनि पंत कविमंडळींनी आनि शाहिरि कवींनि वारसारुपाने मागे ठेवलेला आहे.

अतिशयोक्ति अलंकार

मुंगी व्याली शिंगि झाली तिचे दूध किती
आठरा रांजन भरुन उरले प्याले दोन हत्ती.


दमडिचं तेल आणलं
मामाजींची शेंडि झाली
भावोजींची दाढी झाली
सासुबाईंची न्हाणी झली

उरलं तेल झाकून ठेवलं
लांडोरीचा पाय लागला
वेशीपर्यंत ओघळ गेला
त्यात उंट पोहून गेला


कुठे हि स्वस्ताई अन कुठे आताची १०० रु. लिटर तेलाचि महागाई?

1 टिप्पणी(ण्या):

Sachin म्हणाले...

Thanks a lot for putting this :) pusat aathwat hoti. atishayokti alankaarach udaaharan mhanun shikalo hoto.

Leave a Reply