गुरुवार, २९ एप्रिल, २०१०   3 टिप्पणी(ण्या)


मराठी भाषा अतिशय चमत्कार करू शकणारि आहे.
जेवढे लालित्य भषाविलास, वाग्वैभव संस्कृत दाखवु शकते तेवढेच सामर्थ्य मराठीमधेहि आहे.

           व्याकरण, अलंकार, शब्दविभ्रम, वृत्तरचना यांचा समृद्ध असा खजिना हा संत अनि पंत कविमंडळींनी आनि शाहिरि कवींनि वारसारुपाने मागे ठेवलेला आहे.


पंत कवींचा आविष्कार

अलीकुल वहनाते वहन आणीत होती
शशीधर वहनाने लोटिली मर्गपंथी
नदीपति रिपू ज्याचा तात भंगून गेला
रवीसूत महि संगे फार दुःखीत झाला

काही कळलं का?

काय ढेकळं कळलं ते तुमच्या चेहऱ्यावरुनच दिसतयं.

थांबा आपण प्रयत्न करूया...
अली=भुंगा
शशी= चंद्र, धर=धारण करणारा=शंकर
नदीपती=समुद्र
रवीसुत=कर्ण
महि=भूमी

आत्ता तरि कळलं का?....

नाही
ठिकय...
अजून अटकळ (क्लु) देतो..

मार्गपंथि=रस्त्यावर
रिपू=शत्रू
तात=वडिल
भंगून=फ़ूटुन......काय राव... हा शब्द देखील संगावा लागावा काय तुम्हाला?


आता जमतयं का?....

सोडा..
 मीच सांगतो..

अलीकुल
म्हणजे भोवऱ्याचे वाहन म्हणजे कमळ, त्याचे वाहन म्हणजे पाणी
म्हंजे पाणी आणत होती

तेवढ्यात

शशीधर वहनाने म्हणजे शंकराच्या वहनाने म्हणजे नंदीने म्हणजे बैलाने....
लोटिली मार्ग पंथी
म्हणजे रस्त्यावर लोटून दिली
म्हणजे धक्का दिला

मग पुढे काय....

नदीपति रिपू ज्याचा
म्हणजे समुद्र ज्याचा शत्रू आहे तो..
म्हणजे अगस्ती, त्याचा..
तात भंगून गेला
हा अगस्ती ज्याचा बाप आहे असा तो..
म्हणजे माठ..  तो भंगूण गेला
म्हणजे फूटला
म्हणजे माठ फुटला
आणि..
पुढे काय झालं अजुन?

तर..
रवीसूत म्हणजे कर्ण म्हणजे कान,
महिसंगे म्हणजे जमीनीला लागला
म्हणजे कानाला मार लागला
फार दुःखित झाला
म्हणजे कानाला दुखापत झाली

3 टिप्पणी(ण्या):

swara म्हणाले...

यासारखी आणखी‌ काही कोडी‌आहेत का?...

Unknown म्हणाले...

आशी आणखी कोडी असल्यास वाचायला आवडतील.

अनामित म्हणाले...

अगस्तीचा तात आहे असा तो..म्हणजे माठ
अस असायला हव.

Leave a Reply